मुसलमानी मुलखातील मुशाफिरी 22-Jun-2019, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटरBACK

टॅग कट्ट्यावर *मुसलमानी मुलखांतली मुशाफरी* नमस्कार, *ठाणे आर्ट गिल्ड* च्या *टॅग कट्टा* अंतर्गत, विविध गंधांमार्फत सादर होणाऱ्या कार्यक्रमांत, ह्या महिन्यात दि. २२ जून २०१९ रोजी, *ग्रंथगंध* घेऊन येत आहे, *'कै.श्रीपाद रामचंद्र टिकेकर'* लिखित आणि *डॉ. मनीषा टिकेकर संपादित 'मुसलमानी मुलखांतली मुशाफरी'* हे विशेष आकर्षण!!! श्री.रा. टिकेकर हे डिसेंबर 1928 ते जुलै 1929 या काळात केसरीचे वृत्तपत्राचे प्रवासी प्रतिनिधी म्हणून पेशावर, क्वेट्टा, इराकमधील बसरा आणि बगदाद तसेच इराणमधील आबादान आणि तेहरान अशा मुसलमानी मुलखांत फिरत होते. तेव्हाचे त्यांचे प्रवास-अनुभव पत्ररूपात केसरीतून प्रसिद्ध होत असत. पुढे ही पत्रे 1931 साली *'मुसलमानी मुलखांतली मुशाफरी'* ह्या नावाने प्रथमच पुस्तक रूपात प्रकाशित झाली. अशा प्रकारचे मुसलमानी मुलखावरचे हे पहिलेच मराठी पुस्तक असावे !! केवळ प्रवास वर्णनच नव्हे तर सामाजिक व ऐतिहासिक दस्तऐवज असणारे असे हे दुर्मीळ पुस्तक आहे. प्रस्तावना, माहितीपूर्ण संपादकीय टिपा, चित्रे आणि संदर्भ नकाशांसह हे पुस्तक *डॉ. मनीषा टिकेकर* यांनी आता पुन्हा वाचकांसमोर आणले आहे. ह्या पुस्तकाच्या द्वितीय आवृत्तीच्या निमित्ताने टॅग कट्ट्यावर, डाॅ. मनीषा टिकेकर यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत *सुप्रसिद्ध पत्रकार व लेखक मा. श्री.श्रीकांत बोजेवार.* मुलाखतीदरम्यान *सुप्रसिद्ध अभिनेते श्री उदय सबनीस आणि श्री सागर तळाशीकर हे पुस्तकातील काही रोचक उताऱ्यांचे आणि प्रसंगांचे अभिवाचन सादर करतील.* सर्व स्नेह्यांना आग्रहाचे निमंत्रण ! -सोनाली लोहार टॅग ग्रंथगंध अॅडमिन. *मुसलमानी मुलखांतली मुशाफरी* *दिनांक : 22 जून 2019* *वेळ : सायंकाळी - 7 ते 9* *स्थळ : डॉ.काशीनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह, ठाणे-(प.)* *प्रवेश विनामूल्य*

Other Instructions

डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटर, सायंकाळी 7 ते 9


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune