नवलाई - ९ कथा ९ रस ९ अभिवाचक (शुभारंभाचा प्रयोग) 26-Feb-2018, गडकरी रंगायतन, ठाणे रात्रौ ८.३० वाजता BACK

मराठी भाषा दिना च्या पूर्व संध्येला म्हणजे दिनांक २६ फेब्रुवारी २०१८ रोजी रात्री ८.३० वाजता गडकरी रंगायतन, ठाणे येथे अमृता प्रॉडक्शन निर्मित, टॅग प्रस्तुत "नवलाई" हा अनोखा अभिवाचनाच्या शुभारंभाचा प्रयोग आयोजित केला आहे. या कार्यक्रमाची संकल्पना संध्या टेम्बे आणि सोनाली लोहार यांची असून, या कार्यक्रमात सचिन खेडेकर, मकरंद अनासपुरे, संपदा जोगळेकर कुलकर्णी, उदय सबनीस, मंगेश देसाई ,शिल्पा तुळसकर, पल्लवी वाघ, धनश्री करमरकर, राजश्री गढीकर, संजीव तांडेल, श्रीरंग खटावकर इत्यादी मान्यवर कलाकारांचा सहभाग असणार आहे. ह्या कार्यक्रमाचे वैशिष्ठ्य हे आहे कि, हे सर्व मान्यवर, सुप्रसिद्ध लेखकांच्या कथांचे अभिवाचन करणार आहेत. ह्या कार्यक्रमाचे दिग्दर्शन संतोष वेरूळकर यांनी केले असून प्रकाश योजना योगेश केळकर यांची असेल. ह्या कार्यक्रमाला पार्श्वसंगीत रोहित प्रधान यांनी दिले आहे. तसेच वेशभूषेची जबाबदारी प्रकाश निमकर यांनी घेतली आहे. तिकीट विक्री दिनांक १७ फेब्रुवारी ते २२ फेब्रुवारी दरम्यान संध्या. ६ ते ८ या वेळात डॉ. घाणेकर नाट्यगृहाच्या बाहेर श्री योगेश केळकर (टॅग कमिटी मेम्बर) करणार आहेत. (मोबाईल नंबर +919324045178). तिकीट दर रुपये ३००/-, २००/- असून अधिकृत (Valid) टॅग सभासदांनी काढलेल्या कितीही तिकिटांवर प्रत्येक तिकिटामागे रुपये ५०/- इतका डिस्काउंट मिळेल. उर्वरीत तिकीट विक्री गडकरी रंगायतन येथे दिनांक २३ फेब्रुवारी पासून सुरु होईल.

Other Instructions

काही जागा राखीव गडकरी रंगायतन येथे होणाऱ्या तिकीट विक्री मध्ये कोणालाही डिस्काउंट मिळणार नाही याची नोंद घ्यावी


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune