टॅगकट्टा - मुक्त संवाद/ चित्तरकथा संध्या. ५ वाजता 03-Feb-2018, Ambar Hall, Dr. Ghanekar Natyagruh BasementBACK

‘ठाणे आर्ट गिल्ड’, ही चळवळ ठाण्यातील विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे. त्याच बरोबर या सर्व कलांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांसाठीही आहे. ह्या चळवळीची सुरवात २०१२ च्या डिसेम्बर महीन्यात ठाण्यामध्ये झाली आणि आता बेंगलोर, इंदोर, आणि अगदी अमेरिका या ठिकाणीही TAG कार्यरत आहे. विविध कलांसाठी चे गंध म्हणजेच विविध गट ठाणे आर्ट गिल्ड च्या माध्यमातून उपक्रम करत आहेत. त्यातीलच ‘ग्रंथगंध’ हा एक गट. या गटा मधून विविध साहित्य प्रकार जसे ग्रंथ, प्रवासवर्णन , लेख,निबंध,लघुकथा, कादंबरी इ.यांची चर्चा, विचारांची देवाणघेवाण, लेखन, अभिवाचन, समीक्षण, इ उपक्रम होत असतात. त्यातीलच एक उपक्रम ‘टॅग कट्टा ‘ हा दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी भरतो. दि ३ फेब्रुवारी २०१८ रोजी संध्याकाळी ५ ते ७ या वेळात टॅगकट्टा अंतर्गत ग्रंथगंध चे ११ वे पुष्प 'अंबर हाॅल ,डाॅ.काशिनाथ घाणेकर नाट्यगृह,ठाणे' येथे गुंफले जाणार आहे. कार्यक्रमामधे सुप्रसिद्ध लेखक , दिग्दर्शक आणि अभिनेते श्री.अभिराम भडकमकर यांची मुलाखत घेणार आहेत सुप्रसिद्ध अभिनेते श्री.सागर तळाशीकर लेखनासाठी प्रोत्साहन देऊन नवीन लेखक निर्माण करण्याच्या दृष्टीने संपदा कुलकर्णी यांनी ‘चित्तरकथा’ ही संकल्पना टॅग परिवारात मांडली. या मध्ये दर महिन्याला ग्रंथगंध सदस्यांना 4 चित्रे दिली जातात आणि कोणत्याही चित्रांवर २० वाक्यांची कथा लिहायची. या उपक्रमा मध्ये या वेळी ज्या तीन चित्तरकथा निवडल्या जातील त्याचे अभिवाचन त्या त्या लेखकां कडून या कार्यक्रमात होणार आहे. - सोनाली लोहार टॅग ग्रंथगंध अॅडमिन

Other Instructions

हा खुला कार्यक्रम विनामूल्य असून TAG तर्फे सर्व रसिकांना हार्दिक आमंत्रण आहे. कार्यक्रम वेळेवर सुरू होईल याची नोंद घ्यावी


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune