‘ठाणे आर्ट गिल्ड’, ही चळवळ ठाण्यातील विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे. त्याच बरोबर या सर्व कलांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांसाठीही आहे. ह्या चळवळीची सुरवात २०१२ च्या डिसेम्बर महीन्यात ठाण्यामध्ये झाली आणि आता बेंगलोर, इंदोर, आणि अगदी अमेरिका या ठिकाणीही TAG कार्यरत आहे. विविध कलांसाठी चे गंध म्हणजेच विविध गट ठाणे आर्ट गिल्ड च्या माध्यमातून उपक्रम करत आहेत. त्यातीलच ‘ग्रंथगंध’ हा एक गट. या गटा मधून विविध साहित्य प्रकार जसे ग्रंथ, प्रवासवर्णन , लेख,निबंध,लघुकथा, कादंबरी इ.यांची चर्चा, विचारांची देवाणघेवाण, लेखन, अभिवाचन, समीक्षण, इ उपक्रम होत असतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे ‘टॅग कट्टा ‘. *दि २६ एप्रिली २०१९ रोजी संध्याकाळी ७ ते ९ या वेळात टॅगकट्टा २०१९ अंतर्गत ग्रंथगंध चे द्वितीय पुष्प 'वावीकर आय इन्स्टिट्यूट ऑडिटोरियम,माजिवडा जंक्शन, ठाणे (प) येथे गुंफले जाणार आहे.* या कार्यक्रमांतर्गत सुप्रसिद्ध लेखक -अभिनेते-विचारवंत *श्री. दीपक करंजीकर* लिखीत अत्यंत गाजत असलेल्या *घातसूत्र* या पुस्तकावर श्री. दीपक करंजीकर यांच्याशी सुसंवाद साधणार आहेत *संपदा जोगळेकर कुळकर्णी व सोनाली लोहार* याचबरोबर लेखनासाठी प्रोत्साहन देऊन नवीन लेखक निर्माण करण्याच्या दृष्टीने संपदा कुलकर्णी यांनी ‘चित्तरकथा’ ही संकल्पना टॅग परिवारात मांडली आहे. या मध्ये ग्रंथगंध सदस्यांना ४ चित्रे दिली जातात आणि कोणत्याही चित्रांवर २० वाक्यांची कथा लिहायचे आवाहन केले जाते. या उपक्रमा मध्ये या वेळी ज्या तीन चित्तरकथा निवडल्या जातील त्याचे अभिवाचन ग्रंथगंध टॅगकट्टा या कार्यक्रमात करण्यात येईल. सर्व वाचनप्रेमी रसिकांना सादर आमंत्रण. *प्रवेश विनामूल्य* -सोनाली लोहार टॅग ग्रंथगंध अॅडमिन