ग्रंथगंध टॅग कट्टा 27-Feb-2019, डॉ काशिनाथ घाणेकर मिनी थिएटरBACK

‘ठाणे आर्ट गिल्ड’, ही चळवळ ठाण्यातील विविध कलाक्षेत्रातील कलाकारांना आपली कला सादर करण्यासाठी उभे केलेले एक व्यासपीठ आहे. त्याच बरोबर या सर्व कलांचा आस्वाद घेण्यासाठी रसिक प्रेक्षकांसाठीही आहे. ह्या चळवळीची सुरवात २०१२ च्या डिसेंबर महिन्यात ठाण्यामध्ये झाली आणि आता बेंगलोर, इंदोर, आणि अगदी अमेरिका या ठिकाणीही TAG कार्यरत आहे. विविध कलांसाठीचे गंध म्हणजेच विविध गट ठाणे आर्ट गिल्डच्या माध्यमातून उपक्रम करत आहेत. त्यातीलच ‘ग्रंथगंध’ हा एक गट. या गटामधून विविध साहित्य प्रकार जसे ग्रंथ, प्रवासवर्णन , लेख,निबंध,लघुकथा, कादंबरी इ. यांची चर्चा, विचारांची देवाणघेवाण, लेखन, अभिवाचन, समीक्षण, इ उपक्रम होत असतात. त्यातीलच एक उपक्रम ‘टॅग कट्टा ‘ हा दर महिन्याच्या पहिल्या शनिवारी भरतो. *दि २७ फेब्रुवारी २०१९ रोजी मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून संध्याकाळी ८ ते १० या वेळात टॅगकट्टा अंतर्गत ग्रंथगंधचे २०१९ सालामधील प्रथम पुष्प 'डाॅ.काशिनाथ घाणेकर मिनी नाट्यगृह,ठाणे' येथे गुंफले जाणार आहे.* या कार्यक्रमाअंतर्गत टॅगच्या चार सदस्या संपदा जोगळेकर कुळकर्णी, सोनाली लोहार, हर्षदा बोरकर आणि निर्मोही फडके लिखित *'चार सख्य चोवीस'* या ग्रंथाली प्रकाशित कथासंग्रहाचा ठाणेकर स्नेह्यांकरता खास प्रकाशन सोहळा साजरा करण्याचे योजिले आहे. या कार्यक्रमास सुप्रसिद्ध अभिनेते *श्री.मकरंद अनासपुरे* हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार असून सुप्रसिद्ध पत्रकार,चित्रपट समीक्षक आणि मुलाखतकार *श्री.अमोल परचुरे* हे या निमित्ताने या चार लेखिकांशी संवाद साधणार आहेत. मराठी साहित्य विश्वातील या एका आगळ्या वेगळ्या प्रयोगाचा हा प्रकाशन सोहळा ही नावीन्यपूर्ण असणार आहे. हा खुला कार्यक्रम विनामूल्य असून TAG तर्फे सर्व रसिकांना हार्दिक आमंत्रण आहे.

Other Instructions

कार्यक्रम सर्वांकरिता खुला आहे. कार्यक्रम वेळेत सुरू होईल


Copyrights @2016. All rights reserved
Developed by Web Developers Pune